Top Ads

Tork Kratos इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच, फक्त ९९९ रुपयात करा बुकिंग, पाहा डिटेल्स

 Tork Kratos इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच करण्यात आली आहे. या बाइकला ग्राहक फक्त ९९९ रुपयात बुकिंग करू शकते. या बाइकला कंपनीने १.०२ लाख रुपयाच्या किंमतीत लाँच केले आहे. जाणून घ्या डिटेल्स.


नवी दिल्लीः Tork Motors ने बुधवारी भारतात नवीन Kratos इलेक्ट्रिक बाइक लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या नवीन मोटरसायकलची किंमत १.०२ लाख रुपये आहे. कंपनीने या बाइकला २ व्हर्जन Kratos आणि Kratos R मध्ये आणले आहे. कंपनीने आज इलेक्ट्रिक बाइकसाठी बुकिंग सुरू केली आहे. याची डिलिव्हरी यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सुरू केली जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त ९९९ रुपये देऊन या बाइकला बुक करू शकता.


नवीन Tork Kratos EV ला टप्प्याटप्याने पूर्ण भारतात उपलब्ध केले जाणार आहे. सुरुवातीला या बाइकला पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली सारख्या प्रमुख शहरात लाँच केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात या बाइकला दुसऱ्या अन्य शहरात आणले जाणार आहे.

बाइकची रेंज:-

 बाइकमध्ये 48V सोबत IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. याची IDC रेंज 180 किमी आहे. तर रियल वर्ल्ड रेंज 120 किमी आहे. याला १०० किमी प्रति तासची टॉप स्पीडसाठी रेट करण्यात आले आहे. यात कंपनीने एक्सियल फ्लेक्स टाइप इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. याची टॉप पॉवर ७.५ किलोवॉट आणि पीक टॉर्क २८ एनएम आहे. कंपनीचा दावा आहे की, ही सुरुवाताला शून्य ते ४० किमी प्रति तास स्पीडला ४ सेकंदमध्ये करते. हाय स्पेक Kratos R मध्ये जास्त पॉवरफुल मोटर मिळते. जी 9.0 Kw/38 Nm देते. तसेच स्टँडर्ड मॉडलच्या तुलनेत याची टॉप स्पीड 105 kmph आहे.

फीचर्स, कलर ऑप्शन

Kratos R मोटरसायकल मध्ये फास्ट चार्जिंग शिवाय, कनेक्टिविटी फीचर्स सारखे जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, वेकेशन मोड, ट्रॅक मोड सोबत स्मार्ट चार्ज एनालिसिस मिळते. याचे स्टँडर्ड मॉडल केवळ एक व्हाइट कलर ऑप्शन मध्ये येईल. तर हायर मॉडल पांढरे, निळे, लाल आणि काळ्या सारख्या ऑप्शन सोबत येईल.

Post a Comment

0 Comments